बातम्या

सैनिक टाकळीच्या शेखर पाटलांनी शेतमजुरांना विमानाने नेले बालाजी दर्शनाला

Shekhar Patal of Sainik Takli took the farm laborers to Balaji Darshan by plane


By nisha patil - 9/23/2023 11:26:29 PM
Share This News:



शिरोळ /प्रतिनिधी : जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांना म्हटले जाते शेतकरी पिकवत असलेल्या पिक चांगल्या पद्धतीने यावीत यासाठी रात्रीचा दिवस करून काबाडकष्ट करणाऱ्या शेतमजुरांचेही महत्त्व तितकेच अधोरेखित आहे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी इमाने इतबारे आपल्या काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतमजुरांना स्वखर्चाने विमान व रेल्वेचा प्रवास करून तिरुपती बालाजी दर्शन घडवून आणणाऱ्या सैनिक टाकळी (ता शिरोळ) येथील प्रगतशील शेतकरी शेखर सदाशिव पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .
             

शेखर पाटील हे आपल्या शेतातून नेहमीच वेगवेगळ्या पिकाचे उत्पादन घेत असतात यासाठी कायमस्वरूपी त्यांच्याकडे सुमारे २५ शेतमजूर नियमित रोजणदारीसाठी आहेत हे सर्व शेतमजूर त्यांच्याकडे प्रामाणिकपणे लागेल ते काम करीत असतात यामुळे शेखर पाटील सुद्धा आपल्या कुटुंबाप्रमाणे शेतमजुरांशी वागत असतात ते प्रत्येक वर्षी शेतमजुरांना विविध ठिकाणच्या तीर्थक्षेत्राची भेट देण्यासाठी स्वखर्चाने सहल काढत असतात यावर्षी पाटील यांच्या मावशी व शिरोळमधील प्राथमिक शिक्षिका श्रीमती सुनंदा चंद्रकांत पाटील यांनी त्यांना यावर्षी शेतमजुरांना विमानाने तिरुपती बालाजीला दर्शनाला घेऊन जाण्याची कल्पना सांगितली व स्वतः आपण सोबत येऊ असे आश्वासन दिले त्यामुळे पाटील यांनी तात्काळ निर्णय घेऊन आपल्या कुटुंबाबरोबरच शेतमजूर व त्यांची मुलं यांना विमानाने तिरुपती बालाजीला नेले तेथे दर्शन झाल्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास रेल्वेने करून सैनिक टाकळी येथे सुखरूप आणले .                                                                  

या प्रवासात अनेक शेतमजुरांनी रेल्वेचा सुद्धा प्रवास केला नव्हता तर विमानाचा प्रवास केव्हा घडणार अशी परिस्थिती असताना केवळ पाटील यांच्यामुळे एकाच तीर्थक्षेत्राच्या भेटी प्रसंगी शेतमजुरांना विमान आणि रेल्वेचा प्रवास करण्याची संधी मिळाली प्रवासात अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या यामुळे अनेक शेतमजुरांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले आमचं जीवन सार्थक झालं अशा भावना त्यांनी व्यक्त करून पाटील यांचे आभार मानले
 

शेखर पाटील यांचा शेतमजुरांसोबत असणारा जिव्हाळा प्रेम आपुलकीची भावना यामुळेच त्यांनी शेतमजुरांना वर्षातून काही काळासाठी आनंद देणारा प्रवास घडवून आणला याबाबत त्यांचे कष्टकरी जनतेतून कौतुक होत आहे .


सैनिक टाकळीच्या शेखर पाटलांनी शेतमजुरांना विमानाने नेले बालाजी दर्शनाला