बातम्या

'शेरनी के लौटने का वक्त आ गया है'; अभिनेत्री सुष्मिता सेन

Sherni ke latara ka wakat aa gaya hai Actress Sushmita Sen


By nisha patil - 7/10/2023 5:02:08 PM
Share This News:



 सुष्मिता सेन ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. काही दिवसांपूर्वी तिची ताली ही वेब सीरिज रिलीज झाली होती. आता तिच्या आर्या-3 या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकतीच सुष्मितानं आर्या-3 या वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर केली आहे. सुष्मिता सेनने शुक्रवारी सोशल मीडियावर अॅनिमेटेड व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये पिवळ्या भिंतीवर पंजाच्या खुणा दिसतात. त्यानंतर स्क्रीनवर  3 नोव्हेंबर ही तारीख दिसते. या व्हिडीओला सुष्मितानं कॅप्शनमध्ये लिहिले की,  “शेरनी के लौटने का वक्त आ गया है.” सुष्मिताची आर्या-3 ही वेब सीरिज 3 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सुष्मितानं शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं सुष्मिताच्या व्हिडीओला कमेंट केली, 'प्रतीक्षा संपली. आर्य परत आली आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'आर्या वेब सीरिजच्या दोन्ही सीझन्स 4 ते 5 वेळा पाहिले आहेत. आता सीझन 3 ची लवकर वाट पाहत आहे.शेरनी परत आली आहे.'


'शेरनी के लौटने का वक्त आ गया है'; अभिनेत्री सुष्मिता सेन