बातम्या
बहिणीसाठी आरोग्यदायी सॅनिटरी पॅडची शिदोरी
By Administrator - 9/20/2023 1:54:13 PM
Share This News:
नांदारी तालुका शाहूवाडी येथील श्री.अनिल कांबळे यांनी पाट पन्हाळा या गावातील आपली बहीण अलका दिनकर कांबळे यांना गौरी गणपती साठी पारंपारिक शिदोरी न देता आरोग्यदायी सॅनिटरी पॅडची शिदोरी दिली आहे.
या अनोख्या शिदोरीचं बहिणीने व गावातील महिलांनी कौतुकाने व आनंदाने स्वागत केले आहे .
भाऊ अनिल कांबळे हे प्राथमिक शिक्षक आहेत . ते ' कळी खुलताना ' या उपक्रमाद्वारे गेली ३ वर्ष किशोरवयीन मुली व महिला वर्गांना मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दल जाणिव जागृतीसाठी मार्गदर्शन करतात व मोफत सॅनिटरी नॅपकिन पुरवतात.मासिक पाळी बद्दल महिलांमध्ये जाणीव जागृती व्हावी तसेच या विषयावर समाजात मोकळेपणानं बोललं जावं महिलांचे आरोग्य चांगलं राहावं, या उद्देशाने शिक्षक अनिल कांबळे यांनी गौरी गणपतीत पारंपारिक पद्धतिला फाटा देत शिदोरी म्हणून सॅनिटरी नॅपकिन देण्याचा निर्णय घेतला.
बहिणीसाठी आरोग्यदायी सॅनिटरी पॅडची शिदोरी
|