बातम्या

शिल्पा शेट्टीचा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल

Shilpa Shettys new look is very viral on social media


By nisha patil - 3/20/2024 4:32:40 PM
Share This News:



शिल्पा शेट्टीचा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच  व्हायरल

 बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सिनेमांसह वेबसीरिजमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे. व्यावसायिक आयुष्यासह ,वैयक्तिक आयुष्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते. शिल्पाचा नवा लूक आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा नवा लूक पाहून चाहते तिची तुलना उर्फी जावेदसोबत करत आहेत. 

शिल्पा शेट्टीचा नवा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. शिल्पा शेट्टीचा नवा लूक समोर आल्यानंतर तिची तुलना थेट हटके फॅशनमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदसोबत  केली जात आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकतीच एका अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यापेक्षा चर्चा रंगली ती शिल्पा शेट्टीची. पुरस्कार सोहळ्यातील शिल्पाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा एका वेगळ्याच अंदाजात दिसून येत आहे. शिल्पाच्या या भन्नाट ड्रेसमध्ये प्लॅस्टिकचा रबर दिसून येत आहे. अभिनेत्रीचा हा लूक पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नेटकरी कमेंट करत तिची तुलना उर्फी जावेदसोबत करताना दिसून येत आहेत. उर्फी जावेदकडून या ड्रेसची प्रेरणा घेतली आहेस, राज कुंद्राच्या मास्कचा ड्रेस बनवला आहे, उर्फीचा ड्रेस घातला, तुझा लूक पाहून उर्फीला चक्कर येईल, स्टनिंग लूक, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. एकंदरीतच शिल्पा शेट्टीची तुलना उर्फी जावेदसोबत केली जात आहे. शिल्पा शेट्टीच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.


शिल्पा शेट्टीचा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल