बातम्या
इन्स्टाग्रामला तरुणीला मेसेज केल्यावरुन वाद, युवकाला दिवसाढवळ्या संपवलं
By nisha patil - 1/7/2023 4:51:43 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम सध्या अगदी छोट्याशा कारणावरून मी हाणामारी आणि खून होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे .नुकतीच अशीच एक घटना सध्या घडली असून
श्रेयांश पाटील असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तर आरोपी अमित व श्रेयांश दोघांची एका युवतीसोबत मैत्री होती. घटनेचा सूत्रधार अमित मेश्रामने काही दिवसांपूर्वी श्रेयांसच्या गर्लफ्रेंडला इन्स्टाग्रामवर स्तुती करणारे मॅसेज पाठविले. गर्लफ्रेंडने ही स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केली. ते पाहून श्रेयांस संतप्त झाला. त्याने अमितला इन्स्टाग्रामवर मॅसेज करून त्याच्या गर्लफ्रेंडला मॅसेज न करण्याची धमकी दिली. अमित आणि दोन विधिसंघर्षग्रस्त बालक श्रेयांसच्या घरी आले. त्यांनी श्रेयांसला चर्चा करण्यासाठी बौद्ध विहाराजवळ येण्यास सांगितले. श्रेयांसनेही धोका ओळखून सोबत चाकू घेऊन गेला होता. बौद्ध विहाराजवळ श्रेयांसची आरोपींसोबत मारहाण झाली. आरोपींजवळ रॉड होते. त्यांनी रॉडने हल्ला केल्यानंतर श्रेयांसजवळील चाकू हिसकावून त्याच्यावर वार केला. त्याला गंभीर जखमी करून आरोपी फरार झाले. उपचारादरम्यान आरोपीचा मृत्यू झाला. काही तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली.
इन्स्टाग्रामला तरुणीला मेसेज केल्यावरुन वाद, युवकाला दिवसाढवळ्या संपवलं
|