बातम्या
संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज यांनी उचलले टोकाचे पाऊल
By nisha patil - 5/2/2025 5:35:19 PM
Share This News:
संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज यांनी उचलले टोकाचे पाऊल
संत तुकाराम महाराज यांचे ११वे वंशज हभप शिरीष महाराज मोरे (वय ३०) यांनी आत्महत्या केल्याने तीर्थक्षेत्र देहू हादरले आहे. बुधवारी सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवल्याची घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता, मात्र अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण मोरे कुटुंबीय आणि वारकरी संप्रदाय शोकसागरात बुडाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज यांनी उचलले टोकाचे पाऊल
|