बातम्या
समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’
By nisha patil - 3/21/2024 7:45:26 AM
Share This News:
निरोगी शरीरासाठी दररोज व्यायाम, योगासने, करणे गरजेचे असते. म्हणून आपण वेगवेगळी आसने करत असतो. त्यातलेच एक आसन म्हणजे शीर्षासन जे संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. शीर्षासन केल्याने पाचनक्रियेत लाभ होतो. शीर्षासन नियमित केल्याने मस्तिष्कमध्ये रक्त प्रवाह सुरळीत होतो व वाढतो. तसेच स्मरणशक्ती वाढते. हर्निया, अपचन आदी आजारावर उत्तम उपाय म्हणजे शीर्षासन. अवेळी केस गळणे व पांढरे होणे कमी होते.
या आसनामुळे मेंदूला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. त्यामुळे डोळे, कान, नाक इत्यादींना आरोग्य मिळतं. थायरॉइड ग्रंथी कार्यरत होतात. लैंगिक तक्रारी, व्हेरिकोज व्हेन्सचे विकार उद्भवत नाहीत. तसेच पॅरॅथायरॉइड या ग्रंथींना रक्तपुरवठा होतो. अशक्तपणा व लठ्ठपणा दूर होतो. कारण या दोन्हीही व्याधी थायरॉइडच्या क्रिया अनियमित झाल्याने होतात. अशा या शीर्षासनाचे एक ना अनेक फायदे आहेत. पण हे करताना काही गोष्टींची खबरदारी घेणं आवश्यक आहे.
कसे करावे शीर्षासन :
-सर्वात आधी डोक्याखाली उशी ठेवावी .
-दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतऊन कोप-यापर्यंत हात जमिनीवर टेकवा. एकमेकांत अडकवलेली बोटेही मधोमध ठेवा.
-लक्षात ठेवा की, डोक्याचा वरचा भाग गादीवर व गुडघे जमिनीवर टेकलेले असावेत.
-शरीराचा भार मानेवर तसंच कोपरांवर संतुलित करावा.
-एक गुडघा दुमडत, हळूहळू वर उचलावा, त्याचबरोबर दुसरा गुडघा दुमडून हळूहळू वर उचलावा.
-दोन्ही पाय समांतर रेषेत येतील असे ठेवावेत.
-अशा अवस्थेत असताना श्वासाची गती सामान्य राहू द्यावी. डोळे बंद ठेवावेत.
– पूर्वावस्थेत येण्यासाठी हळूहळू पाय खाली घ्यावेत. एकदम पाय खाली घेतलेत तर मानेला झटका बसण्याची शक्यता असते.
समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’
|