बातम्या

गोकुळमार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

Shiv Jayanti celebrated with enthusiasm through Gokul


By nisha patil - 2/19/2024 3:35:50 PM
Share This News:



गोकुळमार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार सर्वांसाठी प्रेरणादायी !

यशस्वी जीवनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार आत्मसात करावे ! -अरुण डोंगळे

चेअरमन गोकुळ दूध संघ

कोल्हापूर ता.१९: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्य संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ, अधिकारी यांच्‍या उपस्थितीत छञपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्याचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गेली चारशे वर्षे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगाला वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून वैयक्तिक, सार्वजनिक, राजकीय व सामाजिक जीवनामध्ये शिवचरित्र आणि शिव विचारच मार्गदर्शक ठरले आहेत. रयतेचा राजा कसा असावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायला हवेत आणि ते समजण्यासाठी महाराजांचा इतिहास समजून तो आपल्या जीवनाशी जुळवून घेता आला पाहिजे, जीवनात यशस्वी होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी आचार-विचार आत्मसात करून सर्व घटकांनी आयुष्याची लढाई लढण्यासाठी सिद्ध व्हावे. अशा शब्दात श्री डोंगळे यांनी शिवजयंती निमित्त संघाच्या ता.पार्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रम प्रसंगी राजू परुळेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजाची शिव प्रार्थना सादर केली. स्वागत प्रास्ताविक पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक यु.व्ही.मोगले व आभार संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही.तुंरबेकर यांनी मानले.

यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, डॉ.सुजित मिणचेकर, चेतन नरके, डेअरी व्‍यवस्‍थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, संकलन अधिकारी दत्तात्रय वाघरे, बी.आर.पाटील, डॉ.साळुंखे, डॉ. प्रकाश दळवी, शिवाजी पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, अशोक पुणेकर, आर.एन.पाटील व संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, डॉ.सुजित मिणचेकर, चेतन नरके, डेअरी व्‍यवस्‍थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, संकलन अधिकारी दत्तात्रय वाघरे, बी.आर.पाटील, डॉ.साळुंखे, डॉ. प्रकाश दळवी, शिवाजी पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, अशोक पुणेकर, आर.एन.पाटील व संघाचे अधिकारी व कर्मचारी आदि दिसत आहेत.


गोकुळमार्फत शिवजयंती उत्साहात साजरी