बातम्या

जिल्ह्यात शिवजयंती साजरी

Shiv Jayanti celebrations in the district


By nisha patil - 2/19/2024 3:51:53 PM
Share This News:



जिल्ह्यात शिवजयंती उत्सव साजरा

विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन

खाऊ वाटप,स्पर्धा, आदी कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर :  इतिहासाला कलाटणी देणारा पराक्रम करत रयतेचे स्वतंत्र, सार्वभौम स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करण्यासाठी अवघे कोल्हापूर सज्ज झाले आहे. आज सकाळ पासून   शिवजयंती उत्सव दिमाखात साजरा करण्यात आला. याची जय्यत तयारी  शिवाजी पेठ,मंगळवार पेठ,बुधवार पेठ,सोमवार पेठ व उपनगरात सर्वत्र   करण्यात आली. शिवस्मारकांसह परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी व विद्युत रोषणाईने सजावट करून भगव्या पताका-ध्वज लावून वातावरणनिर्मिती करण्यात आली. गल्ली बोळात पोहाडे ऐकायला मिळत होते. यात लहान बालचमू मोठ्या उस्तहात गर्दी करून होते. दरम्यान, विविध गडकोटांवरून शिवज्योत आणण्यासाठी
 
छत्रपती शिवाजी चौकातील शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आला. सकाळी १० वाजून १० मिनिटांनी जिल्ह्यातील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, तालीम संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहीले. छत्रपती चॅरिटेबल

 

देवस्थान ट्रस्टच्या वतीने नर्सरी बागेतील शिवछत्रपतींच्या स्मारक मंदिरात सकाळी १० वाजता शाहू महाराज यांच्या उपस्थितीत आणि पारंपरिक लवाजम्यासह शिवजयंतीचा सोहळा संपन्न झाला. यावेळी छत्रपती शाहु महाराज, आम.ऋतुराज पाटील, आयुक्त के.मंजू लक्ष्मी, जिल्हाधिकारी अमोल येडगे आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जिल्ह्यात शिवजयंती साजरी