बातम्या

शिवसेना सहसंपर्कप्रमुखपदी शाकीर राजमहंमद पाटील यांची निवड...

Shiv Sena Co Communication Chief Shakir Rajamohammed Patil


By nisha patil - 10/4/2024 6:49:36 PM
Share This News:



कोल्हापूर  : राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावचे सामाजिक कार्यकर्ते शाकीर राजमहमंद पाटील यांची शिवसेना कोल्हापूर लोकसभा सह - संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते यांना नियुक्त पत्र देण्यात आले. त्यांच्या सोबत संजय मोरे (शिवसेना सचिव) हे उपस्थित होते.

          यावेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण, तसेच कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मान.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सक्रियपणे पक्षाचा प्रचार आणि प्रसार करणार असून . शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करू असे मनोगत व्यक्त केले. या निवडीसाठी जिल्ह्यातील शिवसेनेचेच्या सर्व नेत्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.


शिवसेना सहसंपर्कप्रमुखपदी शाकीर राजमहंमद पाटील यांची निवड...