बातम्या

शिवसेना महा अधिवेशन, जाहीर सभा "न भूतो न भविष्यति" असे यशस्वी करू : श्री.राजेश क्षीरसागर

Shiv Sena General Convention, public meetings will be successful as


By nisha patil - 2/15/2024 8:32:17 PM
Share This News:



शिवसेना महा अधिवेशन, जाहीर सभा  "न भूतो न भविष्यति" असे यशस्वी करू : श्री.राजेश क्षीरसागर

शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून महासैनिक दरबार मैदानाची पाहणी  

कोल्हापूर दि. १५ : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम होते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचेही कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेची घोडदौड सुरु आहे.

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची प्रथा मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी पुन्हा सुरु केली आहे. मुंबई, ठाण्यानंतर शिवसेना आणि कोल्हापूर हे समीकरण तयार झाले आहे. त्याचमुळे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात होणार आहे. दि.१६ ते १७ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन महासैनिक दरबार हॉल, लाईन बझार येथे होणार असून, दि.१७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांची जाहीर सभा गांधी मैदान येथे पार पडणार आहे. या महा अधिवेशनासाठी देशभरातून शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कोल्हापुरात येणार आहेत. त्यामुळे कोल्हापुरात शिवसेनेचा झंजावात निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचा विश्वास सार्थकी लावून शिवसेनेचे महाअधिवेशन आणि जाहीर सभा शिवसैनिकांच्या साथीने ''न भूतो न भविष्यती'' अशी यशस्वी करू, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. 
 

महा अधिवेशन आणि सभेच्या पार्श्वभूमीवर आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्यासह जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण आदींनी नियोजित स्थळाची पाहणी करत, सुरु असलेल्या जय्यत तयारीचा आढावा घेतला. यासह आवश्यक सूचना संबधितांना दिल्या. 
    

याबाबत सविस्तर माहिती देताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, दि.१६ व १७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महाअधिवेशनामध्ये आज पासून देशभरातील व राज्यातील शिवसेना नेते, मंत्री, प्रवक्ते, उपनेते, खासदार, आमदार यांच्यापासून तळागाळातील पदाधिकारी यांची नोंदणी मुस्कान लॉन येथे स्थापन केलेल्या सुवर्णभूमीतून सुरु करण्यात आली आहे. आज दिवसभरात देशभरातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी कोल्हापुरात दाखल होतील. त्यांच्या राहण्यासाठी शहरासह आसपासच्या परिसरातील सर्व हॉटेल्स आरक्षित करण्यात आली आहेत. उद्या दि. १६ सकाळी सकाळी १० वाजता शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब व शिवसेना नेत्यांच्या हस्ते महासैनिक दरबार मैदान येथे महा अधिवेशनाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. उद्या दिवसभरात अधिवेशनाची तीन सत्रे पार पडतील यामध्य संघटनात्मक बांधणी, राजकीय मोर्चेबांधणी आणि सरकारी योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याची कार्यशाळा या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. यानंतर सायंकाळी ७.३० वाजता मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता आई अंबाबाईचे दर्शन घेतले जाणार आहे. यानंतर सकाळच्या सत्रात निवडणूक व्यवस्थापन प्रशिक्षण या विषयी कार्यशाळा होणार आहे. यानंतर सायंकाळी ६.०० वाजता शिवसेना मुख्यनेते व राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा गांधी मैदान येथे पार पडणार आहे. या सभेस लाखोंच्या संख्येने शहरवासीय व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री.क्षीरसागर यांनी केले.

    महाअधिवेशनाच्या माध्यमातून शिवसेनेची वातावरण निर्मिती

शिवसेनेच्या स्थापनेनंतरच्या इतिहासात शिवसेनेचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात होत आहे. याकरिता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांपासून तालुकाप्रमुखांपर्यंतचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सर्वांना मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब मार्गदर्शन करणार असून, याकरिता स्वत: मुख्यमंत्री ना.शिंदे साहेब तीन दिवस कोल्हापुरात तळ ठोकणार आहेत. सहाजिकच निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे दोन्ही खासदार आणि आमदार निवडणून आणण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी कंबर कसली असून, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतल्याचे चित्र दिसत आहे. शहरासह आसपासच्या भागातील सर्वच हॉटेल्स बुक करून त्या ठिकाणी देशभरातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची निवासव्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना हॉटेल्स वरून अधिवेशन ठिकाणी पोहोचविण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था केली गेली आहे. यासर्वांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी युवासेनेवर सोपविण्यात आली आहे. याचे नेतृत्व युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर करत आहेत. यासह त्यांच्या जेवण, नाष्टा आदीची व्यवस्थाही अधिवेशन ठिकाणीच करण्यात आली आहे. यासाठी दोन प्रशस्त मंडप महासैनिक दरबार मैदान येथे घालण्यात आले आहेत. यासह शहरात स्वागतासाठी सुमारे ४० कमानी, १०० होर्डिंग आणि ७०० फलक उभारण्यात आले आहेत. चौकाचौकात भगवे झेंडे लावून अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेनेने चांगलीच वातावरण निर्मिती केली आहे. 
 

यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, जिल्हा युवा संपर्क अधिकारी प्रसाद चव्हाण, शहरप्रमुख पियुष चव्हाण,  गणेश रांगणेकर, अंकुश निपाणीकर, निलेश हंकारे, अर्जुन आंबी, रियाज बागवान, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.


शिवसेना महा अधिवेशन, जाहीर सभा "न भूतो न भविष्यति" असे यशस्वी करू : श्री.राजेश क्षीरसागर