राजकीय

प्रेशर कुकर घेऊन राजेश लाटकर यांच्यासाठी शिवसेनेचा प्रचाराचा धडाका

Shiv Sena campaign blast for Rajesh Latkar with pressure cooker


By nisha patil - 11/18/2024 11:11:13 AM
Share This News:



'चंद्रकांतदादांची ईडी चौकशी लावा' व 'मोदीची लाट...नव्हे वाट लावयची' म्हणणाऱ्यांना भाजप साथ कशी देणार? - संजय पवार

प्रेशर कुकर घेऊन राजेश लाटकर यांच्यासाठी शिवसेनेचा प्रचाराचा धडाका 

कोल्हापूर: 'चंद्रकांतदादांची ईडी चौकशी लावा' व 'मोदीची लाट...नव्हे वाट लावयची' असे म्हणणाऱ्यांना क्षीरसागर याना भाजप साथ कशी देणार? असा प्रश्न शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ त्यांनी उत्तरेश्वर पेठ व शहराच्या विविध भागात प्रचार सभा घेतल्या. एका टेलीकम्युनिकेशन कंपनीद्वारे आपली गुजराण करणारे चंद्रकांतदादा यांनी करोडो रुपयांची संपत्ती कशी मिळवली याची चौकशी करून भ्रष्टाचारी दादांवर ईडी चौकशी लावावी असे जाहीर खुले आव्हान देणाऱ्या विरोधी उमेदवारांच्या मांडीला मांडी लावून भाजपचे नेते बसत असले तरी या स्वार्थी दलबदलू उमेदवाराबद्दलचा मनातला राग भाजपचे कार्यकर्ते मतपेटीतून निश्चित काढतील असे ते म्हणाले. आपल्या भाषणामध्ये सातत्याने चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबरच पंतप्रधान मोदी यांच्यवर वारंवार टीका करताना स्वतःची उंची न पाहता प्रत्येकाची माप काढणारा हा कोल्हापुरातला राजकारणातला मापाड्या असून त्यांनी सत्तेतून पैसा आणि पैश्यातुन सत्ता मिळवत आपल्या बगलबच्चांच्याद्वारे अमाप संपत्ती गोळा करून संपत्तीचे मायाजाल उभे केले आहे. आता निवडणुकीच्या काळात याच प्रचंड पैशाची उधळण मतदारांच्यावर करत असताना लोकांना त्याचं हे विकृत किळसवाण दर्शन अत्यंत हीन वाटत आहे.

एका बाजूला राजू लाटकर यांचा सारखा एक सामान्य कार्यकर्ता दुसऱ्या बाजूला पैसा, पद, सत्ता याच्या गुर्मीत वावरणारा एक मस्तवाल लोकप्रतिनिधी यांच्यातील फरक जनता नक्की ओळखून वीस तारखेला होणाऱ्या मतदानाच्या त्यांना प्रचंड मतांनी पराभूत करून 2019 सालच्या निवडणुकीची पुनरावृत्ती करतील असे पवार म्हणाले. सतत बदलणारी भूमिका, सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची गुंड प्रवृत्ती आणि राजकारणामधील मस्तीच क्षीरसागर यांच्या पराभवाला कारणीभूत ठरणार आहे. त्यांच्या आसपास फिरणारे व सहयोगी म्हणवून घेणारेच त्यांना पराभूत करतील असे ते पुढे म्हणाले. राजू लाटकर यांच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता ज्यांनी महापालिकेत काम करत असताना तळागाळातल्या लोकांना गोरगरिबांना न्याय तर दिलाच, पण ते उच्चभ्रू लोकांच्या मदतीला सातत्याने धावून जातात.

कायम लोकांच्यात राहून लोकांची कामे करण्यामध्ये प्राधान्य देणारा राजू लाटकर यांच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता कोल्हापुरातून आमदार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लाटकर यांच्या 'प्रेशर कुकर' या चिन्हाचा घरोघरी प्रसार करा व वीस तारखेला लाटकर याना निवडून द्या असे आवाहन पवार यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. या सभेला प्रतापसिंह जाधव, नगरसेवक सचिन चव्हाण व उपजिल्हाप्रमुख अवधूत साळुंखे, वाहतूक सेना प्रमुख हर्षल पाटील, विकास माने, रणजीत आयरेकर, दिनेश परमार, प्रवीण जाधव, उपशहर प्रमुख दत्ताजी टिपुगडे, शशिकांत बिडकर व महिला आघाडी प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे, सरिता मांढरे, दीपा शिंदे, पुनम फडतारे व परिसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रेशर कुकर घेऊन राजेश लाटकर यांच्यासाठी शिवसेनेचा प्रचाराचा धडाका