बातम्या
शिवसेना महाधिवेशनाचा उत्साहात शुभारंभ
By nisha patil - 2/16/2024 6:10:42 PM
Share This News:
कोल्हापूर : शिवसेना महाअधिवेशनाचा शुभारंभ आज कोल्हापुरातील महासैनिक दरबार मैदानात मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून या अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला.
अधिवेशनाचा शुभारंभ होताच राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून स्वागत केले. त्यानंतर अधिवेशनाच्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना आणि हिंदुत्व या विषयावर आपली भूमिका मांडली. यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व ४८ जागांवर महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावे यासाठी लागणारे सर्वाधिकार पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांना देण्याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला. तसेच शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी महायुतीचे ४८ उमेदवार निवडून आणत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आणण्यासाठी सर्व उपस्थित शिवसैनिक बंधू भगिनींना शपथ दिली.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर ,खासदार धैर्यशील माने यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, तसेच राज्यातील हजारो पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना महाधिवेशनाचा उत्साहात शुभारंभ
|