बातम्या

वाहनधारकाला अपशब्द वापरल्याने शिवसेनेकडून वाहतूक पोलीस धारेवर

Shiv Sena on the traffic police line for using abusive language to the driver


By nisha patil - 8/31/2023 5:57:24 PM
Share This News:



गुरुवारी सकाळी कोल्हापूर शहरातील तटाकडील तालीम ते रंकाळा स्टॅन्ड या एक मार्गी मार्गावर विरुद्ध दिशेने आलेल्या दोन तरुणांना शहर वाहतूक शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांनी अडवलं यावेळी तरुणांनी आपली चूक कबूल करून दंड भरण्याची तयारी दर्शवली मात्र संबंधित वाहतूक पोलीस कर्मचारी हे दुसऱ्या एका वाहनधारकाला अडवून पावती करत असताना त्या तरुणांनी परिसरातील मंदिरात दर्शन घेऊन येत असल्याचे सांगितलं यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने अपशब्द वापरत परवाच्या भाषेत त्या तरुणाला ओरडण्यास सुरुवात केली. यावेळी तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या या भाषेला विरोध करत शांत राहण्यास सांगितले. मात्र तरीही पोलीस कर्मचाऱ्याकडून अपशब्द वापरले जात होते या तरुणांनी याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांना माहिती दिल्यानंतर चव्हाण यांनी तात्काळ वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांची भेट घेऊन या प्रकरणाची विचारणा केली. यावेळी त्यांनी संबंधित  वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यालादेखील  धारेवर धरले. सर्वसामान्य वाहनधारकांना अर्वाच्य भाषा वापरण्याचा कायदेशीर अधिकार पोलिसांना नाही आहे. पोलीस देखील नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी 24 तास सेवा बजावत असतात मात्र काही पोलीस कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस प्रशासनाचे नाव खराब होत आहे.त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहनधारकांशी बोलताना सभ्यता बाळगावी असेही यावेळी चव्हाण यांनी सांगितलं. असे प्रकार जर पुन्हा घडले तर ते खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी दिलाय.


वाहनधारकाला अपशब्द वापरल्याने शिवसेनेकडून वाहतूक पोलीस धारेवर