इचलकरंजी महापालिकेवर पहिला महापौर शिवसेनेचाच : योगेश जानकर
By nisha patil -
Share This News:
इचलकरंजी : प्रतिनिधी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना- भाजप युतीचाच खासदार, आमदार आणि महापौर करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे , असे आवाहन शिवसेना महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख योगेश जानकर यांनी केले.
इचलकरंजी येथील मातोश्रीत आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेवर पहिला महापौर शिवसेनेचाच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून गावोगावी शिवसेना पदाधिकारी नियुक्ती करणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेले सरकार आपल्या दारी हे अभियान पोहोचवणे यासह शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम सुरु आहे. त्या अंंतर्गत शिवसेनेचे महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख योगेश जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजी येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि 6 विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी योगेश जानकर यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत शिवसेना-भाजप युतीचाच खासदार, आमदार, महापौर करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचं आवाहन केले. तसेच इचलकरंजी-कोल्हापूर महापालिकेवर पहिला महापौर शिवसेनेचाच असेल असा विश्वासही व्यक्त केला. यावेळी विविध पदाधिकार्यांना जानकर आणि जिल्हा प्रमुख रविंद्र माने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या मेळाव्यास भाऊसो आवळे, रवी लोहार, सतीश मलमे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
इचलकरंजी महापालिकेवर पहिला महापौर शिवसेनेचाच : योगेश जानकर speednewslive24#
|