विशेष बातम्या
उदया होणार कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक दिमाखदार सोहळा
By nisha patil - 5/6/2023 6:43:31 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापुरात उद्या नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखदार पद्धतीने साजरा होणार आहे. शिवराज्यभिषेक दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आज सकाळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी या तयारीची पाहणी केली. उद्या आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर अभिषेक करण्यात येणार आहे.
शाहू महाराज छत्रपती यांनी हा शिवराज्याभिषेक सोहळा 349 वा असल्याचे सांगितले. एकीकडे संभाजीराजे छत्रपती रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत आहेत, तर दुसरीकडे नवीन राजवाडा या ठिकाणी शाहू महाराज, मालोजीराजे आणि संपूर्ण छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. दरवर्षी जुन्या राजवाड्यात साध्या पद्धतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत होता. मात्र, यावर्षीपासून नवीन राजवाड्यावर खूप मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा 349 वा राज्याभिषेक सोहळा मंगळवारी दिनांक 6 जून 2023 रोजी सकाळी साडे सात ते दहा या वेळेमध्ये नवी राजवाड्याच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांनी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होईल, याबाबतची माहिती छत्रपती घराण्याकडून देण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सौ याज्ञसेनीराजे छत्रपती महाराणीसाहेब, मालोजीराजे छत्रपती, सौ. मधुरिमाराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती तसेच निमंत्रित आणि मंडळी उपस्थित राहणार आहेत.
उदया होणार कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक दिमाखदार सोहळा
|