बातम्या
चंदगडमध्ये भाजपकडून शिवाजी पाटील हेच उमेदवार असणार : देवेंद्र फडणवीस
By nisha patil - 8/29/2024 7:48:49 PM
Share This News:
ज्या ठिकाणी जो आमदार ती जागा त्या पक्षाला असं सर्वसाधारण चित्र असल्याने भाजपच्या इच्छुकांची अडचण झाली. त्यामुळेच भाजपचे जिल्ह्यातील बडे नेते समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. तसाच धक्का चंदगडमध्ये बसू नये यासाठी देवेंद्र फडणवीस सक्रिय झाल्याचं दिसतंय. त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना पण चंदगडमधून शिवाजी पाटील हेच उमेदवार असतील हे सूचवलं आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश पाटील हे आमदार आहेत. पण भाजपचे शिवाजी पाटील हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. शिवाजी पाटील हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जातात. 2019 साली त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि पराभूत ही झाले होते. पराभव झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून शिवाजी पाटील यांनी भाजपचं काम सुरू केलं आणि चंदगड तालुक्यामध्ये भाजप घराघरात पोहोचवला. त्यामुळे यंदा भाजपकडून शिवाजी पाटील हेच उमेदवार असणार हे नक्की होतं. पण अजित पवार सत्तेत आले आणि इथली गणितं बदलली. चंदगडचे आमदार राजेश पाटील हे अजित पवारांसोबत गेल्याने शिवाजी पाटलांची गोची झाल्याचं दिसतंय.
चंदगडमध्ये भाजपकडून शिवाजी पाटील हेच उमेदवार असणार : देवेंद्र फडणवीस
|