बातम्या

शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

Shivaji University Dr Babasaheb Ambedkar Jayanti in excitement


By nisha patil - 4/15/2024 11:28:01 AM
Share This News:



 शिवाजी विद्यापीठात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीमध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ. शिवलिंगप्पा सपली यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात