बातम्या

शिवाजी विद्यापीठ परीक्षा आज पासून नियोजित वेळापत्रकानुसार

Shivaji University Exam from today as per scheduled schedule


By nisha patil - 7/21/2023 1:29:41 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : भारतीय हवामान खात्याने सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट चा इशारा दिला होता त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरण सातारा यांनी पश्चिमेकडील तालुके पाटण ,महाबळेश्वर, जावळी ,वाई ,आणि सातारा मधील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली होती त्यामुळे एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शिवाजी विद्यापीठाने गुरुवारची सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित केल्या स्थगित परीक्षांचे नवीन वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर करणार आहे तथापि 21 जुलै पासून च्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होतील अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ अजितसिंह जाधव यांनी दिली


शिवाजी विद्यापीठ परीक्षा आज पासून नियोजित वेळापत्रकानुसार