बातम्या

शिवाजी विद्यापीठ फुटबॉल शहाजी कॉलेज विजेता

Shivaji University Football Shahaji College Winner


By nisha patil - 12/14/2023 10:01:31 PM
Share This News:



शिवाजी विद्यापीठ फुटबॉल शहाजी कॉलेज विजेता

दौलतराव आहेर कॉलेज, कराड येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय फुटबॉल स्पर्धेत येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने पारंपरिक प्रतिस्पर्धी न्यू कॉलेज वर विजय संपादन केले. पेनल्टी शूटआउट वर कर्णधार प्रथमेश हेरेकर यांनी गोल रोखून विजेतेपद मिळविले. तत्पूर्वी झालेल्या उपांत सामन्यात एल. बी. एस. कॉलेज सातारा ला चार विरुद्ध शून्य गोलने हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. शहाजी च्या प्रभू पवार, स्वयम् साळोखे, रोहित पवार, शोएब बागवान, यश कांबळे, सिद्धार्थ पाटील, प्रथम भोसले व संकेत कांबळे यांनी चमकदार कामगिरी केली.
विजेत्या संघाला संस्थेचे चेअरमन मा. श्री. मानसिंग बोंद्रे, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, जिमखाना प्रमुख डॉ. प्रशांत पाटील व प्रशिक्षक श्री. विश्वास मालेकर-कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.


शिवाजी विद्यापीठ फुटबॉल शहाजी कॉलेज विजेता