बातम्या
प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर यांना शिवाजी विद्यापीठ गुणवंत शिक्षक पुरस्कार
By neeta - 5/2/2024 3:46:20 PM
Share This News:
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्यावतीने दिला जाणारा यावर्षीचा शिवाजी विद्यापीठ मराठी गुणवंत शिक्षक पुरस्कार विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर यांना प्रदान करण्यात आला.
क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड कॉलेज, कुंडल येथे शिविमच्या तेराव्या अधिवेशनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी साहित्य संशोधननाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील मराठी विषयाच्या एका प्राध्यापकाला हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार डॉ. आळवेकर यांना मिळाला.
डॉ. आळवेकर यांनी विवेकानंद शिक्षण संस्थेत तीस वर्ष प्राध्यापक म्हणून सेवा केली असून त्यांचे तीन समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहेत. तसेच विविध नियतकालिकातून चाळीस संशोधन लेख प्रसिद्ध झाले आहेत. विविध वृत्तपत्रात त्यांची अनेक पुस्तक परीक्षणे, लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्याचबरोबर अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मराठी साहित्य, भाषा, बोली या विषयावर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी प्राचार्या सौ.शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे, कोल्हापूर विभागप्रमुख श्री श्रीराम साळुंखे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, प्रबंधक श्री. आर. व्ही. जोग, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर यांना शिवाजी विद्यापीठ गुणवंत शिक्षक पुरस्कार
|