बातम्या

शिवाजी विद्यापीठ ‘आयडियाथॉन’ स्पर्धेमध्ये डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस रिसर्च सेंटर अव्वल

Shivaji University in Ideathon competition DY PATIL TECHNICAL CAMPUS RESEARCH CENTER ABOVE


By nisha patil - 3/14/2024 1:15:29 PM
Share This News:



शिवाजी विद्यापीठ ‘आयडियाथॉन’ स्पर्धेमध्ये
डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस रिसर्च सेंटर अव्वल
-प्रा. आरिफ शेख यांचे सिमेंन थावर युनिट प्रथम
-अँटी-रोड संमोहन कॅपलाही तिसरे स्थान 

शिवाजी विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या आयडियाथॉन स्पर्धेमध्ये तळसंदे येथील डी. वाय.पाटील टेक्निकल कॅम्पस रिसर्च सेंटरने जनावरामधील कृत्रिम रेतनासाठी तयार केलेल्या उपकरणाने अव्वल स्थान पटकावले आहे.  याबाबतच्या पुढील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठाकडून सीड फंडिंग केले जाणार आहे.

   डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे हेड प्राध्यापक आरिफ शेख यांच्या सिमेंन थावर युनिटला या स्पर्धेत प्रथम क्रमांक तर अँटी रोड हिप्नॉयसिस कॅप (शिव कवच) या संशोधनाला तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. या संशोधनासाठी सहाय्यक म्हणून कॉम्प्युटर विभागातील तृतीय वर्षाच्या साक्षी मेनकर, निहाल शेख व ललित टेकाळे यांचा सहभाग होता.

    प्रथम क्रमांक मिळालेल्या संशोधनाचा विषय हा ऍनिमल हसबंडरी डिपार्टमेंट (महाराष्ट्र शासन) कडून आलेल्या प्रॉब्लेम स्टेटमेंट वर होता.  जनावरांमध्ये कृत्रिम रेतन प्रक्रियेमध्ये विशेषत: गाय व म्हैस माजावर असताना (हिट पिरियड) सिमेनची गुणवत्ता, त्याचे तापमान हे योग्य असणे गरजेचे आहे.  ही गुणवत्ता योग्य राहावी यासाठी  प्रा. शेख यांनी अनेक महिने काम करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडेल असे संपूर्ण भारतीय बनावटीचे उपकरण तयार केले. या संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या जनावरे माजावर येण्याच्या काळात त्याला योग्य पद्धतीने कृत्रिम रेतन देण्यासाठी या उपकरणाची मदत होणार आहे. या उपकरणासाठी भारत सरकारकडून पेटंटही प्राप्त झाले आहे. या संशोधनानंतर दोन युनिट  तयार करण्यात आली असून पहिले युनिट हे  पशुवैद्यकीय अधिकारी सहजपणे वापरू शकतील असे  सौर उर्जेवर चालणारे उपकरण आहे तर दुसरे युनिट हे प्रयोगशाळा उपकरण असेल. 

याच स्पर्धेत प्रा. शेख यांनी तयार केलेल्या अँटी-रोड संमोहन कॅप ( शिवकवच) या संशोधनला तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.  रस्त्यावरून वाहन चालवताना विशेषतः समृद्धी महामार्गसारख्या मेगा हायवेवर ड्राईव्ह करत असताना रोड हिप्नोसेस ला बळी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.  अशा परिस्थितीत शिवकवच अतिशय परिणामकारक ठरणार आहे.  हे उपकरण संपूर्णपणे स्वयंचलित असून चालकाला झोप येऊ देत नाही.  जरी चालक झोपेच्या अधीन होत असेल तर त्याला पुर्णपणे जागा करण्याचे काम अँटी-रोड संमोहन कॅप करते. 

    या रिसर्च प्रोजेक्टसाठी टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. सतीश पावसकर यांचे मार्गदर्शन व शैक्षणिक अधिष्ठाता प्राध्यापक आ.  एस. पवार,  डॉ. विशाल सूर्यवंशी व विभाग प्रमुख प्रा. उमेश पाटील सर यांचे सहकार्य लाभले. 

 संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता यांनी या यशाबद्दल सर्व संशोधकांचे अभिनंदन केले आहे.
 


शिवाजी विद्यापीठ ‘आयडियाथॉन’ स्पर्धेमध्ये डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस रिसर्च सेंटर अव्वल