बातम्या

शिवाजीनगर पोलीस ठाणे राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे

Shivajinagar Police Station is the best police station in the state


By nisha patil - 5/7/2023 4:58:53 PM
Share This News:



शिवाजीनगर पोलीस ठाणे राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे

इचलकरंजी, शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हे राज्यातील सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाणे ठरले आहे. याबाबतची घोषणा पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आज मंगळवार ता.४ रोजी झाली. राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाणे स्पर्धेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याला मान मिळाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. लवकरच पोलीस ठाण्याला सन्मानचिन्ह व रोख बक्षिस प्रदान केले जाणार आहे.

देशपातळीवर पोलीस पोलीस ठाण्याचा सन्मान केला जातो. सन २०२१ वर्षातील सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाणे स्पर्धेकरीता कार्यमुल्यांकनाच्या बाबतीत परिक्षेत्र निहाय व आयुक्तालय निहाय प्राप्त उत्कृष्ठ पोलीस ठाण्यामधून राज्यस्तरावरील समितीने ५ पोलीस ठाण्यांची सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाणे २०२१ म्हणून घोषणा केली आहे. यामध्ये राज्यात तसेच कोल्हापूर जिल्हात शिवाजीनगर पोलीस ठाणे अव्वल ठरले आहे. तर नांदेड येथील देगलुर पोलीस ठाणे द्वितीय, छत्रपती संभाजीनगर शहर येथील बालुंज पोलीस ठाणे तृतीय, गोंदिया येथील अर्जुनीमोर पोलीस ठाणे चतुर्थ तर ठाण्यातील राबोडी पोलीस ठाणे पाचव्या क्रमांकावर आहे.विनोद शिगे कुभोज


शिवाजीनगर पोलीस ठाणे राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे