विशेष बातम्या

शिवांगी जोशी आता झळकणार एकता कपूरच्या मालिकेत

Shivangi Joshi will now appear in Ekta Kapoors serial


By nisha patil - 5/6/2023 6:30:59 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम 'ये रिश्ता क्या कहलता है'  या मालिकेतील नायरा म्हणजे शिवांगी जोशीच्या चहात्यांना    एक आनंदाची बातमी आहे. शिवांगी आता एकता कपूरच्या आगामी मालिकेत दिसणार आहे. 
शिवांगी जोशी मागच्या वर्षी रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 12'मध्ये दिसली होती. तसेच 'बालिका वधू 2'मध्येही मोठ्या आनंदीच्या भूमिकेत ती दिसली होती. 'बेकाबू' या मालिकेतदेखील गेल्या काही दिवसांपूर्वी ती दिसली होती. आता एकता कपूरच्या आगामी मालिकेत ती कुशाल टंडनच्या विरोधात दिसणार आहे. 
 शिवांगी जोशी आणि एकता कपूरच्या आगामी मालिकेचं नाव 'बरसाते' असं आहे. अद्याप निर्मात्यांनी या मालिकेसंदर्भात अधिक माहिती जाहीर केलेली नाही. 'बरसाते' ही एक लव्हस्टोरी आहे. या मालिकेत शिवांगी जोशी दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या महिन्याच्या शेवटी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. 'बरसाते' मालिकेचं नवं कथानक आणि फ्रेश जोशी प्रेक्षकांच्या पसंतीस येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. या नाट्यमय मालिकेत शिवांगी पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. 19 जूनपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


शिवांगी जोशी आता झळकणार एकता कपूरच्या मालिकेत