बातम्या

' शिवरायांचा छावा ' १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

Shivarai s Chhawa in theaters on February 16


By nisha patil - 12/2/2024 11:19:30 PM
Share This News:



कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शिवरायांचा शंभू छावा हिंदू म्हणुनी अमर जाहला ।। या दोन ओळीतच खऱ्या अर्थान छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्राने स्वराज्याला दिलेला महान असा स्वराष्ट्रवाद, स्वधर्माभिमान व्यक्त हातो. छत्रपती संभाजी महाराजांच  नाव जरी घेतल तरी मृत्यूला  ज्याच्यासमोर ओशाळावं लागल त्या हिमालयाएवढ कर्तुत्व असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजाना मनोमन नमन केल जात. अद्वितीय राजकारण, आक्रमक रणनीती अणि रणकौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. स्वराज्य रक्षणार्थ अनंत अत्याचार सोसत  बलिदान देणाऱ्या या हिंदवी स्वराज्याच्या वाघाचा पराक्रमी इतिहास उलगडणारा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवरायांचा छावा हा भव्य ऐतिहासिकपट १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे ए ए फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्वितीय व्यक्तिमत्व धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योध्याची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. आलेल्या संकटांवर पाय रोऊन उभे राहत छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या अतूलनीय शौर्य, हुशारी आणि धाडस या गुणाचे दर्शन शिवरायांचा छावा' या चित्रपटात घडणार आहे. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, भूषण पाटील, रवी काळे, समीर धर्माधिकारी, राहूल देव, विक्रम गायकवाड, भूषण शिवतरे, अमित देशमुख, तृप्ती तोरडमल, ईशा केसकर ,प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद, ज्ञानेश  वाडकर, आशुतोष वाडकर, बिपिन सुर्वे, दीप्ती लेले, सचिन भिल्लारे आदि कलाकारांच्या भूमिका शिवरायांचा छावा चित्रपटात आहेत.


' शिवरायांचा छावा ' १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात