बातम्या
शिवरात्री - महिन्यातली सर्वात काळोखी रात्र
By nisha patil - 8/3/2024 7:38:11 AM
Share This News:
काही ठिपके ज्यांना आपण आकाशगंगा म्हणतो ते साधारणपणे लक्षात येतात, पण त्यांना धरून ठेवणारी विशाल पोकळी कुणाच्या लक्षात येत नाही. ही विशालता, ही अमर्याद पोकळी, यालाच शिव म्हणतात. आज आधुनिक विज्ञान देखील सिद्ध करते की सर्व काही शून्यातून येते आणि शून्यात परत जाते. याच अर्थाने शिवाला, जो विशाल पोकळी किंवा शून्यता आहे, त्याला महादेव म्हणून संबोधले जाते.
या ग्रहावरील प्रत्येक धर्म, प्रत्येक संस्कृती नेहमीच परमात्म्याच्या सर्वव्यापी स्वरूपाबद्दल बोलत आली आहे. जर आपण त्याकडे पाहिले, तर एकच गोष्ट जी खरोखर सर्वव्यापी असू शकते, सर्वत्र असू शकते, ती म्हणजे काळोख, पोकळी किंवा शून्यता.
साधारणपणे, जेव्हा लोक कल्याणाच्या शोधात असतात, तेव्हा आपण परमात्म्याला प्रकाश म्हणून संबोधतो. जेव्हा लोक कल्याणाच्या शोधात नसतात, जेव्हा ते त्यांच्या जीवनाच्या पलीकडे जाऊन अस्तित्वात विलीन होण्याच्या शक्यतेकडे पाहत असतात, जेव्हा त्यांच्या उपासनेचा आणि साधनेचा उद्देश विलीन होणे असतो, तेव्हा आपण नेहमी परमात्म्याला काळोख म्हणून पाहतो.शिवरात्री हा महिन्यातला सर्वात काळोखा दिवस आहे. दर महिन्याला शिवरात्री साजरी करणे, आणि खासकरून महाशिवरात्री साजरी करणे, जवळपास अंधकाराचा उत्सव साजरा केल्यासारखे वाटते. कोणतेही तार्किक मन अंधाराचा विरोध करेल आणि नैसर्गिकरित्या प्रकाशाची निवड करेल. पण “शिव” या शब्दाचा अर्थ “जे नाही ते” असा होतो. "जे आहे," ते अस्तित्व आणि निर्मिती आहे. "जे नाही”, ते शिव आहे. “जे नाही” म्हणजे, जर तुम्ही डोळे उघडून आजूबाजूला पाहिले, जर तुमची दृष्टी छोट्या मोठ्या गोष्टींकडे असेल, तर तुम्हाला बरीच सृष्टी दिसेल. जर तुमची दृष्टी खरोखरच मोठ्या गोष्टी शोधत असेल, तर तुम्हाला दिसेल की अस्तित्वातील सर्वात मोठी उपस्थिती एक विशाल पोकळी आहे.
शिवरात्री - महिन्यातली सर्वात काळोखी रात्र
|