बातम्या
जिल्हा परिषद मध्ये शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे पुजन
By nisha patil - 6/6/2024 9:49:39 PM
Share This News:
कोल्हापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 या दिवशी शिवराज्याभिषेक सोहळा झाला होता.रयतेच्या हिताचा व कल्याणाचा कारभार कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या महापुरूषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे शिवस्वराज्यभिषेक दिन होय. अशा रयतेच्या जाणत्या राजाच्या राज्याभिषेकाचे महत्त्व आणखी दृढ व वृद्धिंगत होण्यासाठी या वर्षीपासून 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये "शिवस्वराज्यदिन "
म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषद येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारुन पुजन केले त्यानंतर
" शिवस्वराज्यदिन " मोठया उत्साहात साजरा करण्यात त्याचबरोबर शिवराज्यभिषेक सोहळा प्रतिमापूजन , माझी माय बोली परिवार राधानगरी यांच्यावतीने शिव चरित्रावरील निवडक प्रसंगांचे नृत्य व नाटिकेच्या माध्यमातून सादरीकरण " गाथा महाराष्ट्राची, कथा स्वराज्याची " सादर करण्यात आले. स्वराज्य गुढी उभारणीनंतर राष्ट्रगीत झाले. व जिल्हा परिषद,कलामंच यांचेवतीने जय जय महाराष्ट्र माझ्या या राज्यगीताचे सादरीकरण करणेत आले.
सागर चौगुले यांच्या माझी माय बोली परिवार राधानगरी यांच्यावतीने शिव चरित्रावरील निवडक प्रसंगांचे नृत्य व नाटिकेच्या माध्यमातून सादरीकरण " गाथा महाराष्ट्राची, कथा स्वराज्याची " भव्य एैतिहासीक प्रसंगांचे पारंपरीक वेषामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणेत आले.सदर सादरीकरणामध्ये वरील दोहोंचे उत्कृष्ट सादरीकरण झालेनंतर सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकरी अधिकारी मनीषा देसाई यांनी आभार मानताना सहभागी सर्व कलाकारांचे कौतुक केले. कार्यक्रमास
जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अतिरिक्त पोलीस अधिक्षक जयश्री देसाई , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(सा.प्र) मनीषा देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे , उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील , शिक्षणाधिकारी (प्राथ.) मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी (माध्य) एकनाथ आंबोकर , समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार जिल्हा, कार्यकारी अभियंता (बांधकाम) सचिन सांगावकर ,जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गायकवाड , कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा वैद्यनाथ कराड , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ प्रमोद बाबर, कृषी विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुषमा पाटील यांनी केले.
जिल्हा परिषद मध्ये शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे पुजन
|