बातम्या

महाडिक गटाला धक्का, गडमुडशिंगीच्या सरपंचासह , सदस्यांचा आमदार सतेज पाटील गटात प्रवेश....

Shock to the Mahadik group along with the sarpanch of Gadmudshingi


By nisha patil - 6/17/2023 8:15:26 PM
Share This News:



गडमुडशिंगी वार्ताहर:- काळजी करू नका लागेल ती ताकत आणि मदत करू असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी, गडमुडशिंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांना दिला. गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांनी आमदार सतेज पाटील गटात आज जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमावेळी आमदार सतेज पाटील बोलत होते. आमदार ऋतुराज पाटील यांच्या सहकार्याने चांगले काम करा. गडमुडशिंगीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
करवीर तालुक्यातील  गडमुडशिंगी ग्रामपंचायत सरपंच अश्विनी शिरगावे, ग्रामपंचायत सदस्य संजय सकटे, सरिता कांबळे यांनी आमदार सतेज पाटील गटात आज जाहीर प्रवेश केला. अजिंक्यतारा कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमावेळी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी, या सरपंच आणि सदस्यांचा सत्कार करत त्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, सत्ता असताना अनेक जण जाहीरपणे प्रवेश करत असतात. मात्र सत्ता नसतानाही कोणतीही अपेक्षा न ठेवता गडमुडशिंगीच्या सरपंच आणि सदस्यांनी केलेला प्रवेश हा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. गावच्या विकासासाठी ज्या उद्देशाने तुम्ही निवडून गेला तो उद्देशच साध्य होत नसल्याने, ज्या विश्वासाने आमदार सतेज पाटील गटात प्रवेश केला आहे. त्या विश्वासाला तडा दिला जाऊ देणार नाही. तुम्ही केलेल्या प्रवेशामुळे काही जण तुमच्यावर दबाव आणतील. मात्र काळजी करू नका. लागेल ती ताकत आणि मदत करू असा विश्वासही आमदार सतेज पाटील यांनी दिला. लोकाभिमुख कारभार करा, गावच्या गरजा ओळखून गावच्या विकासासाठी सर्वांनी एक जुटीने काम करा. असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार ऋतुराज पाटील यांनी,  गडमुडशिंगी च्या सरपंच आणि सदस्यांनी केलेल्या प्रवेशामुळे  आमदार सतेज पाटील गटाला मोठे बळ मिळाले आहे. येणाऱ्या काळात गावाचा विकास हेच ध्येय ठेवूया. कार्यकर्त्यांनी आपला गट कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करण्याचा आवाहनही त्यानी केले. शिवाय गावाची प्रगती झाली पाहिजे, अडचणी सुटल्या पाहिजेत. यासाठी येणाऱ्या काळात गडमुडशिंगी ग्रामपंचायीवर एकहाती आपली सत्ता कशी येईल या भूमिकेने काम करू असेही आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.

सरपंच अश्विनी शिरगावे यांनी, आमदार ऋतुराज पाटील यांची लोकांबद्दलची आपुलकी, राजकारणातील सभ्यता कसी असते हे आम्ही शिकलो. त्यांचे विकासाचे ध्येय पाहून आम्ही आमदार सतेज पाटील गटात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी, माजी पंचायत समिती सदस्य सचिन पाटील, ज्ञानेश्वर सोसायटी चेअरमन सर्जेराव पाटील, सुकुमार देशमुख, रावसाहेब पाटील,  पाणी पुरवठा संस्था चेअरमन संजय पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला  डॉ. अशोकराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासो माळी, उंचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य कविता पाटील, अरुण शिरगावे, संभाजी दांगट, आनंदा बनकर, संदीप गौड, संजय कांबळे, सुदर्शन पाटील, दिलीप थोरात, ग्रा प सदस्या अलका सोनुले छाया नेर्ले, तेजस्विनी सुर्यवंशी, बजरंग रणदिवे यांच्यासह गडमुडशिंगीचे कार्यकर्त उपस्थित होते.


महाडिक गटाला धक्का, गडमुडशिंगीच्या सरपंचासह , सदस्यांचा आमदार सतेज पाटील गटात प्रवेश....