बातम्या

धक्कादायक : कोल्हापूर जिल्ह्यात नदीपात्रात आढळल्या ४ मानवी कवट्या

Shocking 4 human skulls found in riverbed in Kolhapur district


By nisha patil - 1/7/2023 4:46:50 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर अली आहे. कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली पैकी नदीकिनारा इथं दूध गंगा नदीपात्रामध्ये ४ मानवी कवट्या आढळून आल्या आहेत. सकाळी पोहायला आलेल्या तरुणांना या कवट्या निदर्शनास आल्या. या घटनेमुळे सिध्दनेर्लीसह कागल तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कागल पोलीस ठाण्याचे   अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी याठिकाणी पाहणी करून या मानवी कवट्या ताब्यात घेतल्या आहेत 
सध्या पावसाअभावी दुधगंगा नदीपत्रात पाणी  पाणी कमी झाले आहे. आज सकाळी पोहायला गेलेल्यांना या 4 कवट्या आढळून आल्या. या घटनेची माहिती समजताच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.सध्या या कवट्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून फॉरेन्सिक लॅब द्वारे या मानवी कवट्यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे का हे तपासले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिलीय.


धक्कादायक : कोल्हापूर जिल्ह्यात नदीपात्रात आढळल्या ४ मानवी कवट्या