बातम्या

धक्कादायक ! कसबा बावड्यात कचराकुंडीत आढळले कापडात गुंडाळलेले जिवंत अर्भक

Shocking A live infant wrapped in a cloth was found in a garbage dump in Kasba Bawa


By nisha patil - 1/1/2024 3:24:05 PM
Share This News:



धक्कादायक ! कसबा बावड्यात कचराकुंडीत आढळले कापडात गुंडाळलेले जिवंत अर्भक 


कोल्हापूर : कसबा बावडा इथं गजबजलेल्या वस्तीत श्रीराम सेवासंस्था पेट्रोल पंपासमोर रस्त्याकडेला एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक सापडल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या अर्भकाला तत्काळ सेवा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सीपीआर रुग्णालयात दाखल केलं आहे.

आज कोल्हापूर महापालिकेचा स्वच्छता कर्मचारी सकाळी साडेआठच्या सुमारास श्रीराम सेवासंस्था पेट्रोल पंपासमोरील कोंडाळ्यात पडलेला कचरा एकत्रित करीत होते. यावेळी कचरा ओढत असताना त्यांना लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. सुरुवातीला त्याला ही बाहुली असेल असं वाटले. पुन्हा त्यानं कचरा हलवल्यानंतर पुन्हा मुलाच्या रडण्याचा आवाज आला. यावेळी ऐन कडाक्याच्या थंडीमध्ये कचऱ्यात टाकलेलं स्त्री अर्भकाला कापडात गुंडाळल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. त्या कर्मचाऱ्याने तात्काळ ही माहिती आरोग्य निरीक्षकांना दिली. यावेळी संबंधितांनी या अर्भकाला दुसऱ्या कपड्यात लपेटून तातडीनं सेवा रुग्णालयात दाखल केलं. 
   

कितीही प्रबोधन केले तरी अजूनही नको असलेली मुलगी रस्त्यावर टाकून देण्याची मानसिकता समाजातून कमी झालेली नाही याचे प्रत्यय आज पहायला मिळाले. या घटनेची शाहूपुरी पोलिसात नोंद झाली आहे.
 

याबाबत शाहूपुरी पोलिस या  स्त्री अर्भकाच्या माता-पित्याचा शोध घेत आहेत. तर सीपीआर रुग्णालयात या मुलीवर उपचार करण्यात येत आहेत.

   याबाबत सविस्तर माहिती अशी की, 

 महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी बापू घाटगे व घंटागाडीचे चालक विजय डोंगळे सकाळी साडे आठच्या सुमारास श्री राम पेट्रोल पंपा समोर उघड्या कोंडळ्यात पडलेला कचरा एकत्रित करत होते. खोऱ्याने कचरा ओढाताना त्यांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी हाताने कचरा बाजूला करून पाहिले असता पोट्यासह प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळलेली स्त्री जातीचे अर्भक दिसले. त्यांनी तत्काळ ही माहिती आरोग्य निरीक्षकांना दिली. संबधितानी काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने रिक्षाने या अर्बकाला दुसऱ्या कपड्यात गुंडाळून सेवा रुग्णाला दाखल केले.

तिथे त्याची  स्वच्छ्ता व किरकोळ उपचार करून पुढील उपचारासाठी त्यास रुग्णवाहिकेतून सीपीआर नेण्यात आले. कमी कालावधीत जलदगतीने उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला. सकाळी थंडी असल्याने त्याच्या शरीराचे तापमान कमी झाले होते. त्यामुळे त्याला पेटीत ठेवण्यात आले आहे.


धक्कादायक ! कसबा बावड्यात कचराकुंडीत आढळले कापडात गुंडाळलेले जिवंत अर्भक