बातम्या

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कटाचा धक्कादायक प्रकार समोर

Shocking conspiracy revealed after Santosh Deshmukhs murder


By nisha patil - 8/3/2025 10:37:15 PM
Share This News:



संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कटाचा धक्कादायक प्रकार समोर

 गोपनीय साक्षीदाराचा खळबळजनक जबाब

मयत संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर आता त्यांना कायमचा धडा शिकवण्याच्या कटाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तपास अधिकाऱ्यांना गोपनीय साक्षीदाराने दिलेल्या जबाबात विष्णू चाटे यांनी स्पष्टपणे सांगितले की, "वाल्मिक अण्णांचा स्पष्ट आदेश आहे - काम थांबले , खंडणी मिळाली नाही, आणि जर संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा."

या प्रकरणात सुदर्शन घुले यांनी देखील कंपनी बंद करण्याची पक्की व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. "यावेळी मी कंपनी बंद करण्यासाठी पक्की व्यवस्था करतो. कोणीही आडवा येणार नाही!" असे घुले यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, पोलिसांकडून संबंधित आरोपींच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे.


संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कटाचा धक्कादायक प्रकार समोर
Total Views: 67