समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत धक्कादायक खुलासा

Shocking disclosure regarding accident on Samriddhi highway


By nisha patil - 10/7/2023 5:10:36 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी झालेल्या खाजगी बसच्या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघाताने राज्यात एकच खळबळ माजली होती. 25 निष्पापांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेचा अंतिम फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात धक्कादायक खुलासा झाला आहे. ‘ती’ ट्रॅव्हल्स ओव्हरटेक लेनमधून धावत असल्याचा खुलासा अहवालात झाला आहे. व बसची पीयुसी प्रमाणपत्राची मुदतही 31 मार्चपर्यंत होती फॉरेन्सिक फायर अँड सायबर इन्वेस्टीगेटर्स या संस्थेने त्या संदर्भात तपास करून एक अहवाल बुलढाणाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.


समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत धक्कादायक खुलासा