बातम्या

महाड मधील काळीज हादरवणारी बातमी समोर

Shocking news in Mahad


By nisha patil - 2/16/2024 6:12:48 PM
Share This News:



 एका महिलेवर सहा वर्षे सातत्याने अत्याचार करुन तिचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करणाऱ्या आणि पैसे उकळणाऱ्या नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. महिलेवर सहा वर्षे सातत्याने अत्याचार करुन तिचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करणाऱ्या आणि पैसे उकळणाऱ्या नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी एका मुख्य आरोपीसह चार जणांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
 

या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी इमरान इब्राहिम अंतुले  याच्यासह  अयनान सनाउल्ला पोरे  मैनुद्दीन हिदायत ढोकले  आणि अकील अफसर फामे  अशी आरोपींची नावे आहेत. महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

2018 पासून महिलेवर अत्याचार तक्रारदार महिलेवर 2018 पासून मुख्य आरोपीद्वारे अत्याचार करण्यात आला असल्याची कबुली पीडित महिलेने यावेळी सांगितल्याने सर्वांचा थरकाप उडाला आहे. मोबाईलवर तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते आपल्या मित्रांमध्ये व्हायरल करत या पीडित महिलेवर हे नराधम अत्याचार करत होते. त्यानंतर इतर अन्य ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी देत त्या बदल्यात 2 लाख 20 हजार रुपये उकळल्याची  धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.


महाड मधील काळीज हादरवणारी बातमी समोर