बातम्या

क्षयरोग आजारावरील AkT नामक मोफत औषधांचा कोल्हापूर जिल्ह्यात तुटवडा...

Shortage of free drugs called AkT for tuberculosis disease in Kolhapur district


By nisha patil - 8/5/2024 5:53:24 PM
Share This News:



क्षयरोग अर्थात TB या आजारावरील AkT नावाच्या मोफत औषधांचा गेल्या 2 ते 3 महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात तुटवडा जाणवत आहे.  जिल्ह्यातील सरकारी आणि महापालिका क्षेत्रातील दवाखाण्यात ही औषधे उपलब्ध नसल्याचे संबंधित रुग्णांना सांगितले जात असून त्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागत असून त्यांची बोळवण केली जात आहे.

काही तक्रारी समाजमन संस्थेला प्राप्त झाल्या असून त्याची संस्थेने शहानिशा ही केली आहे. 
 त्यामुळे या आजाराची लागण अन्य सुदृढ लोकांना अर्थात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ज्यांना हा आजार आहे, त्या पैकी काहींचा या औषधाअभावी अकाली मृत्यू ही होण्याचा धोका संभवत आहे. भारतातून क्षयरोगाचे 2030 पर्यंत समूळ उच्चाटन करण्याच्या शासनाच्या महत्वाकाक्षी उद्दिष्टाला पूर्णपणे हरताळ फासला जाणार आहे आणि ही बाब चिंताजनक ठरू शकते. गंभीर परिस्तिथी विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने सर्व सरकारी आणि संबंधित महापालिका क्षेत्रातील दवाखाण्यात या आजारावरील ही औषधे त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी कोल्हापूर मधील समाजमन बहुदेशिय सामाजिक संस्था करत आहे.


क्षयरोग आजारावरील AkT नामक मोफत औषधांचा कोल्हापूर जिल्ह्यात तुटवडा...