बातम्या

पुण्यात कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार

Shot on notorious gangster Sharad Mohol in Pune


By nisha patil - 5/1/2024 6:04:27 PM
Share This News:



पुण्यात कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आला. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर हा जीवघेणा हल्ला टोळीने केला की हल्लेखोर अन्य कुणी होते, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.


शरद मोहोळ कोथरूड परिसरातील सुतारदरा भागातून जात होता. त्यावेळी अचानक दुचाकीवरून काही जण आले. त्यांनी शरद मोहोळ याच्या जवळ जाऊन अचानक गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या चुकल्या मात्र, एक गोळी त्याच्या खांद्याला लागली.

घटनेत जखमी झालेल्या शरद मोहोळला तातडीने कोथरूड परिसरातच असलेल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून माहिती अद्याप समोर आलेली नाही.
शरद मोहोळ हा गँगस्टर म्हणून कुख्यात आहे. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. विरोधी टोळीतील पिंटू मारणे याच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केले होते. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती. या कालावधीत येरवडा कारागृहात त्याने आणि विवेक भालेराव या दोघांनी मिळून दशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला होता.


पुण्यात कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार