बातम्या

तापात आंघोळ करावी का?

Should you bathe in fever


By nisha patil - 9/14/2023 7:28:18 AM
Share This News:



गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन-पावसाचा खेळ सुरू आहे. ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेल्यानंतर सप्टेंबरमध्ये पावसाने हजेरी लावली होती. मात्र, आता पुन्हा पावसाने ओढ दिल्याने उकाडा वाढला आहे.

वातावरणात होत असलेल्या या बदलांचा आरोग्यावर परिणाम होतो. गेल्या दिवसांपासून व्हायरल फिव्हर म्हणजेच तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

वातावरणात बदल झाल्यानंतर व्हायरल फिव्हर, सर्दी, खोकला, डोकेदुखी यासारखे आजार मागे लागतात. अशात जर तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असेल आजारांची तीव्रता कमी होते. मात्र, व्हायरल फिव्हर असल्यास काळ काळजी घ्यावी हे जाणून घेणे गरजेचे आहे. तसंच, तापात काय खावे, हेदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. आपले पूर्वज तापात आंघोळ करु नये असा सल्ला द्यायचे पण ते खरं आहे का तापात आंघोळ करावी का?, या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

व्हायरल फिव्हर सारखा-सारखा का येतो?

पावसाळ्यात तापाच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढते. घरातील एका व्यक्तीला ताप आल्यावर लगेच संपूर्ण घरातही तापाचे रुग्ण वाढतात. एकदा ताप आल्यानंतर अनेक दिवस हा ताप राहू शकतो. ज्याची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे त्यांना व्हायरल फिव्हरचा धोका वाढू शकतो. खासकरुन लहान मुलं आणि वृद्धांना याचा त्रास अधिक जाणवतो. व्हायरल फिव्हरमध्ये सतत थंडी-ताप जाणवतो. एकदा का व्हायरस एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाल्यास तो म्युटेट होतो आणि पुन्हा त्या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता असते.

तापात आंघोळ करावी का?

ताप आला असताना आंघोळ करावी का? याबाबत अनेक समज- गैरसमज आहेत. खरंतर व्हायरल फिव्हरमध्ये शरीराची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. शरीराची जितकी स्वच्छता राखाल तितके लवकर बरे व्हाल. ताप आला असताना कोमट पाण्याने व साबणाने शरीराची स्वच्छता राखा. यामुळं तुम्हाला फ्रेश वाटेल आणि लवकर बरेदेखील व्हाल.

घरच्या घरी उपचार करु नका

साधा ताप आल्यावर अनेकजण घरच्या घरीच औषध घेतात. मात्र, तसे करु नका. तापातही डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण जर उपचार न घेता घरीच औषधे घेतली तर ताप लवकर उतरणार नाही. गरम पाणी, आल्याचा चाहा, काढा आणि वाफ यामुळं तुम्हाला तात्परता आराम पडेल मात्र तुम्ही त्यामुळं ताप कमी होणार नाही. तापावरही योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.


तापात आंघोळ करावी का?