बातम्या

गोकुळ शिरगावमध्ये शौमिका महाडिकांना पुस्तक प्रकाशन करण्याचा सन्मान...

Shoumika Mahadika has the honor of publishing a book in Gokul Shirgaon


By nisha patil - 9/1/2025 8:03:32 PM
Share This News:



 गोकुळ शिरगावमध्ये शौमिका महाडिकांना पुस्तक प्रकाशन करण्याचा सन्मान...

 गोकुळ शिरगावमध्ये शौमिका महाडिकांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन... 

 गोकुळ शिरगावातील इयत्ता नववीत शिकणाऱ्या साची शितल सुतार या विद्यार्थिनीने तिच्या केरळ प्रवासावर आधारित माझा केरळ प्रवास हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा सन्मान गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिकांना लाभला. साचीने आपले काका वसंत सुतार यांच्या सहाय्याने लिहिलेल्या या पुस्तकात केरळ प्रवासादरम्यान तिला आलेले अनुभव कथन केलेत. शालेय वयातच साची मधील लेखिका आकार घेत आहे याचा मनस्वी आनंद वाटतो. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला वसंत सुतार, जयसिंगराव घाटगे हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष एम एस पाटील,मुख्याध्यापक एस एस जाधव, करवीर पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी सुजाता गायकवाड, गोकुळ शिरगावच्या उपसरपंच नूतन पाटील, यांच्यासह अन्य मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.


गोकुळ शिरगावमध्ये शौमिका महाडिकांना पुस्तक प्रकाशन करण्याचा सन्मान...
Total Views: 62