बातम्या
शाळा अन् कॉलेजसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात दाखवा 'छावा'
By nisha patil - 2/19/2025 9:59:35 PM
Share This News:
शाळा अन् कॉलेजसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात दाखवा 'छावा'
अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा सध्या चर्चेत आहे. तसेच, संभाजी महाराजांचे त्याग, बलिदान आणि शौर्याची गाथा म्हणजे हा सिनेमा. त्यामुळे, प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक शिवप्रेमींना हा सिनेमा पाहायलाच हवा असा सूर निघत आहे. त्या दृष्टीने शिवप्रेमींकडून आवाहन देखील केलं जात आहे.
तर, हा सिनेमा टॅक्स फ्री करावा, अशी मागणी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. मात्र, हा सिनेमा टॅक्स फ्री करता येणार नाही, कारण राज्य सरकारकडून 2017 पासून चित्रपटांवर करमणूक कर लावलाच जात नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर, आता महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाचे आमदार किरण सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेगळीच मागणी केली आहे. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 50 टक्के सवलतीच्या दरात हा सिनेमा दाखवला जावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
शाळा अन् कॉलेजसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात दाखवा 'छावा'
|