बातम्या
कामात प्रगती नसल्याने शहर अभियंता सरनोबत यांना कारणेदाखवा नोटीस!
By nisha patil - 5/15/2024 10:21:09 PM
Share This News:
कोल्हापूर : प्रतिनिधी या ना त्या कारणाने बहुचर्चेत असलेल्या कोल्हापूर महापालिकेत आज वेगळाच प्रकार..महापालिका प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी, (१५ मे २०२४) रोजी रंकाळा तलाव संवर्धन व सुशोभिकरणाच्या कामाची अचानक पाहणी केली. धक्कादायक प्रकार म्हणजे कामाच्या ठिकाणी एकही कामगार नव्हता. यंत्रसामग्री नव्हती. ठेकेदारांकडून पूर्ण क्षमतेने काम सुरू नसल्याचे निदर्शनास आले. यावर प्रशासकांनी नाराजी व्यक्त केली. कामामध्ये प्रगती नसल्याने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
रंकाळा तलाव संवर्धन व सुशोभिकरणासाठी राज्य सरकार व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध आहे. त्या निधीमधून सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम संथगतीने होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत होत्या. त्या तक्रारींची दखल घेत प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी, बुधवारी दुपारी रंकाळा तलाव परिसरातील कामाची पाहणी केली. यावेळी ठेकेदारामार्फत पूर्ण क्षमतेने कामे सुरु नसलेचे निदर्शनास आले. त्याचबरोबर कामावर ठेकेदाराचे एकही कामगार उपस्थित नव्हता.
कोणतीही यंत्रसामुर्गी उपलब्ध नव्हती. याबद्दल प्रशासकांनी नाराजी व्यक्त केली. मुदतीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कामामध्ये प्रगती नसल्याने शहर अभियंता यांना प्रशासकांनी कारणे दाखवा नोटीस आज बजावली आहे. रंकाळा तलाव हा कोल्हापूरचे वैभव आहे. पर्यटकांचे आकर्षण आहे. तलावाच्या संवर्धन व सुशोभिकरणासाठी सरकारकडून निधी मिळाला आहे. त्या निधीच्या माध्यमातून होत असलेली कामे मुदतीत पूर्ण करुन घेण्याच्या कडक सूचना शहर अभियंत्यांना दिल्या आहेत.
अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून निधी मंजूर झाला आहे. रंकाळा पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत कोल्हापूर महापालिकेसाठी रंकाळा तलाव येथील पदपथ उद्यानात रिटेनिंग हॉल बांधणे,२३४ मीटर लांब पदपथ बांधकाम करणे, तलावाच्या नेव्ही इकॉलॉजीचे पुनरुत्थान अशा कामांचा समावेश आहे.
कामात प्रगती नसल्याने शहर अभियंता सरनोबत यांना कारणेदाखवा नोटीस!
|