बातम्या
श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट मध्ये रंगला वैज्ञानिकांचा जागर...
By nisha patil - 2/3/2024 1:18:56 PM
Share This News:
श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट मध्ये रंगला वैज्ञानिकांचा जागर...
भारतात डॉ. सी. व्ही. रमण यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. विज्ञानाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. देशाचे भविष्य हे शाळेच्या चार भिंतीच्या आत मध्ये तयार होत असते. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल गोडी निर्माण व्हावी व भविष्यात या विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य घडून यावे या उदात्त हेतूने प्रत्येक शाळेत विज्ञान दिन साजरा केला जातो. याही वर्षी या दिनाचे औचित्य साधत श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते. इयत्ता नववी मधील विद्यार्थी व विद्यार्थिनीनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची मांडणी यावेळी केलेले होती. ( Chandrayan-3, History of indian currency, Robot using Recycled material, FM Radio using Recycled Aluminium foil & wire) एवढ्या लहान वयात त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमधून साकार झालेल्या उपक्रमांची पाहणी करताना परीक्षकांच्यात कुतूहल दिसून येत होते. विज्ञानाच्या क्षेत्रात भारताने प्रचंड मोठी प्रगती केलेली आहे. या प्रगतीचे मूळ स्त्रोत हे विद्यार्थी व असे अनेक उपक्रम असतात असे मत अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
सकाळपासूनच परिसरातील अनेक नामवंत मान्यवर, शिक्षण क्षेत्रासंबंधित बरीच मंडळी, संस्थेवर प्रेम करणारा पालक वर्ग, दहावी अकरावीच्या विद्यार्थ्यांनी यांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी इन्स्टिट्यूटच्या स्वामी विवेकानंद हॉलमध्ये प्रचंड गर्दी केल्याचे यावेळी दिसून आले.
श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करियर डेव्हलपमेंट ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात जे कार्य करते ते
इतरांपेक्षा काहीक पटीने निराळे असते. याची प्रचिती या विज्ञान प्रदर्शनात दिसून आली. अतिशय नेटके नियोजन, विद्यार्थ्यांचा भरभरून सहभाग, नाविन्यपूर्ण प्रकल्प हे या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य ठरले.
या समारंभाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ए. आर.तांबे सर, समन्वयक .एम.एस.पाटील, समन्वयिका . सुप्रिया कौंदाडे, सौ.संगीता पवार, .अभिषेक तांबे, .सृष्टी तांबे उपस्थित होते.
श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट मध्ये रंगला वैज्ञानिकांचा जागर...
|