बातम्या
NEET परिक्षेत श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
By nisha patil - 6/17/2023 8:19:55 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी इचलकरंजी येथील ए आर तांबे संचलित श्रद्धा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मध्ये नीट मध्ये उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा खासदार संजय काका पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी संस्थेचे अध्यक्ष ए आर तांबे यांनी संस्थेच्या कामकाजाची आणि निकालाची माहिती दिली नीट परीक्षेत श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या रेकॉर्ड ब्रेक निकालाची परंपरा कायम राखली तब्बल 27 विद्यार्थ्यांनी सहाशे पेक्षा अधिक गुण संपादन करत यशाचे यशोगाथा कायम ठेवली आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रद्धा इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी मोठ्या संख्येने मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतील असा विश्वास संस्थेने दर्शविला यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये प्रतीक जगदाळे ,आदित्य पाटील ,वैभव कांबळे, शरण्य तंत्री, श्रीधन प्रधान, विवेक घोडके ,जयदीप सावंत, राहुल पाटील ,श्लोक येलझरे ,साहिल देसाई, अपूर्वा चौगुले ,रसिका केरीपाळे ,अथर्व येडेकर ,समीक्षा माने ,प्रणित चव्हाण, सुमित माने ,रसिका सरंगळे ,दिशा चव्हाण ,श्रुती देशमुख ,अदिती काशीद, दीपक चनगुंडी, उत्कर्ष पाटील, साक्षी जाधव ,श्रुती पाटील ,समृद्धी पाटील ,भूषण गवस ,वेदिका कल्याणी या विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला धर्माने जसे वाराणसीच्या काशीला पवित्र क्षेत्र मांडले जाते त्याचप्रमाणे श्रद्धा इन्स्टिट्यूट ही ज्ञानाची गंगा आहे संस्थेचे योग्य नियोजन विद्यार्थ्यांच्या उत्तम करिअरसाठी झटणारी श्रद्धाची सर्व टीम आणि पालकांचा खंबीर पाठिंबा यामुळे श्रद्धाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर आदराने घेतले जात आहे या संस्थेसाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य लाभेल असे प्रतिपादन खासदार संजय काका पाटील यांनी केलं याप्रसंगी खासदारांनी सांगली जिल्ह्यातील श्रद्धाच्या विद्यार्थी आणि पालकांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या या कार्यक्रमाविषयी संस्थेचे कोऑर्डिनेटर सोप पवार मॅडम अक्षय तांबे सौ सृष्टी तांबे आणि संजय काकांचे कार्यकर्ते बाबासो पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने करण्यात आली
NEET परिक्षेत श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
|