बातम्या

श्रद्धाने आपल्या रिलेशनशीपची कबुली दिली आहे. मात्र...

Shraddha has confessed her relationship


By nisha patil - 6/19/2024 8:40:52 PM
Share This News:



श्रद्धाने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत अनेक चांगल्या चित्रपटात काम केले आहे. श्रद्धाच्या अभिनय कौशल्याचेही कौतुक झाले. आपल्या व्यावसायिक जीवनापासून ते वैयक्तिक आयुष्याबाबत श्रद्धा कपूर चर्चेत असते. आता श्रद्धाने आपल्या रिलेशनशीपची कबुली दिली आहे. श्रद्धाच्या अफेअरबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, त्यावर तिने भाष्य केले नाही. आता, थेट तिने आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले. 

श्रद्धा कपूरने  आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट स्टोरीवर एक पोस्ट केली आहे.  ‘तू झूठी मैं मक्कार’चा लेखक राहुल सोबत तिने आपला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत दोघेही एकत्र दिसत आहेत. श्रद्धाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. या फोटोवर तिने कॅप्शन देत लिहिले की, ''माझं हृदय तू ठेव पण  माझी झोप मला दे यार...'' या फोटो कॅप्शनवर तिने  स्माईली आणि फनी इमोजीसह हार्ट इमोजीदेखील  पोस्ट केली आहे. या इन्स्टा स्टोरीवर तिने राहुललादेखील टॅग केले आहे.


श्रद्धाने आपल्या रिलेशनशीपची कबुली दिली आहे. मात्र...