बातम्या

श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा बारावी निकाल 72 टक्के

Shree Shahaji Chhatrapati College 12th result 72percent


By Administrator - 5/26/2023 7:56:28 AM
Share This News:



कोल्हापूर  प्रतिनिधी दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा बारावी निकाल 71.09 टक्के लागला. यामध्ये वाणिज्य शाखा  81 टक्के ,तर कला  शाखेचा 61.21 % निकाल लागला. कला शाखेत कुमारी आदिती अर्जुन कदम हिने 82.83  ℅ गुण मिळवून प्रथम आली .तर वाणिज्य शाखेत कुमारी कोमल ज्ञानदेव व्हराबळे 81.50% गुण मिळवून प्रथम  आली. 
   महाविद्यालयाचा निकाल पुढीलप्रमाणे वाणिज्य शाखा मध्ये  आंबी सिद्धी सचिन 80.83 ℅ द्वितीय, पाटील ऋतुजा वसंत 76.67 ℅ तृतीय क्रमांक, हिरवे सानवी सुरेश 75. 50℅ चतुर्थ क्रमांक पटकावला. कला शाखेत - कांबळे सलोनी अजित 74  ℅ द्वितीय, शेख  खालीद सर्फराज 69.17 ℅ तृतीय क्रमांक शिंदे ऋतुजा राजाराम 67. 17℅ चतुर्थ क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे  मानद सचिव श्रीमती संगीता विजयसिंह बोंद्रे, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, पर्यवेक्षक प्रा. एम. टी. पाटील व सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.


श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा बारावी निकाल 71.09 टक्केspeednewslive24#