बातम्या
पैजारवाडीत श्री दत्त जयंती महोत्सवाला सुरुवात
By nisha patil - 12/21/2023 7:03:32 PM
Share This News:
पन्हाळा : पन्हाळातील पैजारवाडी येथील सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिरमध्ये दत्त जयंती महोत्सव २०२३ मोठ्या उत्सहात साजरा होत असून, आज पासून त्याचा प्रारंभ झाला आहे. या महोत्सवात २७ डिसेंबर पर्यंत दत्त नवरात्र,पालखी सोहळा,महाप्रसाद तसेच विविध उपक्रमासह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सलाबाद प्रमाणे पैजारवाडी येथे सद्गुरू चिले महाराजांचे प्रमुख शक्तीपीठ व कासवकृती समाधी मंदिरातील श्री दत्त जयंती महोत्सवाची सुरवात मंगळवारी १९ तारखेला झाली. पहाटे दत्त महाराजांची काकड आरती संपन्न झाली, सकाळी त्यांचा अभिषेक करण्यात आला. दुपारी पुन्हा आरती झाली. तसेच सायंकाळी श्री दत्त नवरात्र उपासना व अखंड नामविणा गुरुचरित्र पारायनाचा आरंभ झाला. यावेळी मंदिरामध्ये अत्यंत भक्तिमय वातावरण पसरलं होतं. तसेच भाविकांची गर्दीही पाहायला मिळाली.
दत्त जयंती मंगळवार ही दि.२६ डिसें.रोजी सायं.५.४५ वाजता आहे. तर दत्त जन्मकाळ हा ६ वाजता असल्याने त्यावेळी पालखी सोहळा सपन्न होईल. बुधवार दि.२७ डिसें. रोजी सकाळी ११ ते सायं.५ या वेळेत महाप्रसादाचे वितरण होईल. या उत्सव नवरात्र कालावधीत रोज पहाटे दत्त महाराजांची काकड आरती,सकाळी अभिषेक,त्रिकाल आरती,रात्रौ भजन,कीर्तन,प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांचे व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भक्तांनी या दत्त जयंती महोत्सवात सहभागी होवून दत्त महाराजांच्या दर्शनाचा व सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
पैजारवाडीत श्री दत्त जयंती महोत्सवाला सुरुवात
|