बातम्या

मोहन भागवत यांना श्रीकृष्ण गीतानुग्रह पुरस्कार' प्रदान..

Shri Krishna Geetanugrah Award given to Mohan Bhagwat


By nisha patil - 10/12/2024 6:17:12 PM
Share This News:



 सनातन धर्माच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 'श्रीकृष्ण गीतानुग्रह पुरस्कार' प्रदान केला.प्रत्येक हिंदूने सनातन धर्माचे  जतन, पालनपोषण आणि संवर्धन केले पाहिजे. आणि त्यांच्या वचनबद्धतेबाबत खंबीर राहिले पाहिजे, यावर राष्ट्रीय स्वयंसेवर संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भर दिला.उडुपी मठातील गीता मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

धार्मिक नेते आणि संतांना आध्यात्मिक मूल्ये आणि राष्ट्रीय आदर्शांचे समर्थन करण्यासाठी समाजाला अधिक प्रभावीपणे मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.भगवद्‍गीतेच्या शिकवणीचा संदर्भ देताना भागवत म्हणाले, 'भगवान कृष्णाने अर्जुनाला आव्हानांना सामोरे जाण्याचा आणि त्यांच्यापासून पळून न जाण्याचा सल्ला दिला. मग ते युद्ध असो किंवा इतर कोणतीही परिस्थिती.

त्याचप्रमाणे भगवद्‍गीता जेव्हा सामान्य जनतेसाठी सुलभ भाषेत सादर केली जाते, तेव्हा ती समाजासाठी मार्गदर्शक शक्ती म्हणून काम करू शकते. आरएसएस नसते, तर हिंदूंना देशात आणखी मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला असता.'


मोहन भागवत यांना श्रीकृष्ण गीतानुग्रह पुरस्कार' प्रदान..