बातम्या
दिवंगत माजी आम.श्रीपतराव शिंदे यांचा पक्ष फोडणाऱ्या अपप्रवृत्तीला धडा शिकवा : राजे समरजितसिंह घाटगे यांचे आवाहन.....
By nisha patil - 5/11/2024 9:36:42 PM
Share This News:
दिवंगत माजी आम.श्रीपतराव शिंदे यांचा पक्ष फोडणाऱ्या अपप्रवृत्तीला धडा शिकवा : राजे समरजितसिंह घाटगे यांचे आवाहन.....
गडहिंग्लज येथे महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन......
गडहिंग्लज/ प्रतिनिधी दिवंगत माजी आम.श्रीपतराव शिंदे यांनी जनता दल पक्षाच्या माध्यमातून गडहिंग्लज तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यातील शेवटच्या श्वासापर्यंत अश्रू पुसण्याचे काम केले आहे .2019 च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान पालकमंत्र्यांच्या विजयामध्ये तर त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता.तरी देखील स्वर्गीय शिंदेच्या अकाली निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसात त्यांच्या निष्टेशी गद्दारी करून त्यांचा जनता दल पक्ष फोडण्याचे महापाप पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.त्यामुळे स्वर्गीय शिंदेच्या निष्ठेशी गद्दारी करणाऱ्या पालकमंत्र्यांच्या अपप्रवृत्तीला धडा शिकवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
गडहिंग्लज येथे महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
घाटगे पुढे बोलताना म्हणाले, गेली सात वर्षे अव्याहतपणे कोणतीही सत्ता नसताना या परिसराच्या शाश्वत विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. मी कोणताही पुढारी,नेता, वरिष्ठ नेता म्हणून तुमच्याकडे आलेलो नाही.तर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहे.मला आशिर्वाद द्या.आपला मान सन्मान वाढवण्यासाठी आपल्या हक्काचा आमदार म्हणून काम करेन. असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
यावेळी रियाजभाई शमणजी, शिवाजीराव खोत, दिलीपराव माने, बसवराज आजरी, ॲड.दिग्विजय कुराडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी महेश कोरी,बाळासाहेब मोरे,मन्सूर मुल्ला, रवींद्र घोरपडे, अण्णासाहेब पाटील, बाबासाहेब पाटील, राजेश बोरगावे, नितीन देसाई, सागर पाटील ,उदय कदम, शेखर येरटे, सुभाष चराटी,सतीश पाटील,शंकरराव रणदिवे यांच्यासह गडहिंग्लजसह कडगाव-कौलगे तसेच उत्तूर परिसरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक सुनील गुरव यांनी केले.. सागर पाटील यांनी आभार मानले..
गडहिंग्लजसह परिसरातून राजेंना
मताधिक्य देणार....
ॲड.सुरेशराव कुराडे म्हणाले,मोठ्या विश्वासाने येथील जनतेने गेल्या पंधरा वर्षांपासून पालकमंत्र्यांची पाठराखण केली.मात्र त्यांनी येथील स्थानिक जनतेच्या समस्यांना प्राधान्य न देता आपल्या सोयीनुसार त्यांचा कारभार सुरू आहे.शैक्षणिक विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या या परिसराच्या शाश्वत विकासाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. पालकमंत्र्यांच्या या सर्व बाबी येथील स्वाभिमानी जनतेच्या लक्षात आलेल्या असल्याने या परिसरातून राजेंना नक्की मताधिक्य देणार असा विश्वास व्यक्त केला..
दिवंगत माजी आम.श्रीपतराव शिंदे यांचा पक्ष फोडणाऱ्या अपप्रवृत्तीला धडा शिकवा : राजे समरजितसिंह घाटगे यांचे आवाहन.....
|