बातम्या

विवेकानंद कॉलेजच्या शुभम जाधव ची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

Shubham Jadhav of Vivekananda College selected in Maharashtra team for national hockey tournament


By nisha patil - 7/22/2024 12:21:46 PM
Share This News:



 विवेकानंद कॉलेजमध्ये बी. ए. भाग 1 मध्ये शिकत असलेला शुभम संजय जाधव याची सेकंड हॉकी इंडिया वेस्ट झोन चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी छत्तीसगड येथे दि. 21 ते 28 जुलै 2024 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.  पुणे येथे झालेल्या निवड चाचणी मध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्हयातून आलेल्या  80 खेळाडूमधून त्याची निवड झालेली आहे.   शुभम जाधव याला प्रशिक्षक  श्री सागर जाधव व श्री. योगेश देशपांडे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.

            या यशाबद्दल त्याचे  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ईओ. श्री कौस्तुभ गावडे ,  विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार  व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. आर.बी.जोग यांनी अभिनंदन केले  व  शुभेच्छा दिल्या.  

 वरील खेळाडूस  जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा संतोष कुंडले, प्रा समिर पठाण, प्रा.प्रशांत कांबळे,  श्री सुरेश चरापले  यांचे बहुमोल मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


विवेकानंद कॉलेजच्या शुभम जाधव ची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड