खेळ
शुभम सिदनाळेचा कुस्ती मैदानात दणदणीत विजय..
By nisha patil - 10/2/2025 1:13:08 PM
Share This News:
शुभम सिदनाळेचा कुस्ती मैदानात दणदणीत विजय..
हिंदू गर्जना चषकावर कोल्हापुरी शिलेदाराची मोहोर
पुण्यात झालेल्या हिंदू गर्जना चषक कुस्ती स्पर्धेत शुभम सिदनाळेने ऐतिहासिक विजय मिळवला. अंतिम फेरीत पुण्याच्या मुन्ना झुंजूरकेविरुद्ध ४० मिनिटे दमदार झुंज देत निर्णायक ५ मिनिटांत १०-१ अशा फरकाने विजय मिळवला.
या शानदार विजयासह शुभमने २.५० लाख रुपये व चांदीचा गदा जिंकत महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी दंड थोपटले.या दिमाखदार विजयानंतर त्याने पुढील वर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले. त्याच्या या यशाबद्दल संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शुभम सिदनाळेचा कुस्ती मैदानात दणदणीत विजय..
|