बातम्या
शुभमन गिलचा आयसीसीच्या 'या' खास पुरस्काराने गौरव
By nisha patil - 10/13/2023 5:02:36 PM
Share This News:
शुभमन गिलचा आयसीसीच्या 'या' खास पुरस्काराने गौरव th
आयसीसीचा 'प्लेअर ऑफ दी मंथ' मिळाला हा पुरस्कार
मोहम्मद सिराज आणि डेविड मलान यांना मागे टाकत मिळवला मान
भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याची चर्चा सुरु असतानाच शुभमन गिल याला आयसीसीने खास पुरस्काराने सन्मानित केले आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे शुभमन गिल याला आयसीसीने प्लेअर ऑफ दी मंथ हा पुरस्कार दिला आहे.
आयसीसीने नुकताच सप्टेंबर 2023 च्या प्लेअर ऑफ दी मंथ पुरस्काराची घोषणा केली आहे. यंदाच्या महिन्यात शुभमन गिल याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून. शुभमन गिलने मोहम्मद सिराज आणि डेविड मलान याला पछाडत हा पुरस्कार पटकावला.
सप्टेंबर महिन्यात शुभमन गिल याने 80 च्या जबराट सरासरीने 480 धावांचा पाऊस पाडला होता. सप्टेंबर महिन्यात आशिया चषकात सर्वाधिक धावा शुभमन गिल याच्या नावावर आहे. आशिया चषक स्पर्धेत शुभमन गिल याने 75.5 च्या सरासरीने 302 धावा केल्या आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरोधात शुभमन गिल याने दोन सामन्यात 178 धावा केल्या होत्या. त्यामुळेच शुभमन गिल याला आयसीसीने प्लेअर ऑफ दी मंथ पुरस्काराने गौरवण्यात आले.
शुभमन गिलचा आयसीसीच्या 'या' खास पुरस्काराने गौरव
|