बातम्या

सिद्धार्थच्या 'मिस यू' चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर आउट

Siddharths Miss You first look poster out


By nisha patil - 6/6/2024 9:53:05 PM
Share This News:



अभिनेता सिद्धार्थ आता पुन्हा एकदा रोमँटिक चित्रपटात झळकणार आहे. सिद्धार्थची मुख्य भूमिका असलेला मिस यू चित्रपटाचा फर्स्ट लूक आउट झाला आहे. रोमँटिक हिरो आर. माधवनने या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले. सिद्धार्थ बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा रोमँटिक हिरोच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांना या चित्रपटाची प्रतिक्षा लागली आहे. सिद्धार्थ हा 'इंडियन-2' मध्ये ही झळकणार असल्याचे वृत्त आहे.
 

विक्रम' आणि 'लिओ'चा दिग्दर्शक लोकेश कनागराजने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर 'मिस यू' चे फर्स्ट लुक पोस्टर शेअर केले आहे. फर्स्ट लूक चे  पोस्टर लाँच करताना आनंद वाटत असल्याचे त्याने म्हटले. सिद्धार्थ आणि चित्रपटाच्या सगळ्या टीमला कनागराजने शुभेच्छा दिल्या आहेत.


सिद्धार्थच्या 'मिस यू' चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर आउट